ऐतिहासिक पर्यटनाचे माहेर, धुळे जिल्ह्यातील 'थाळनेर' !




✒️रणजितसिंह राजपूत


‘धुळ्याच्या ईशान्येकडे शिरपूर तालुक्यात सुमारे ४७ किलोमीटर अंतरावर थाळनेरचा किल्ला व गाव वसले आहे. हा किल्ला व गाव अतिशय दुर्लक्षित आणि उपेक्षित असे होते. सव्वासहाशे वर्षापूर्वी हे गाव आणि किल्ला अतिशय वैभवशाली, समृद्ध, मोठी बाजारपेठ असलेले, भरभराटलेले, अभेद्य आणि खानदेशची राजधानी असलेले होते. ‘थळ’ म्हणजे जमीन आणि ‘नीर’ म्हणजे पाणी. जेथील जमीन समृद्ध आणि जेथे भरपूर पाणी आहे ते ‘थाळनेर’. हे थाळनेर मध्ययुगात समृद्ध असलेले गाव होते. आणि याच ठिकाणी आंतरराष्ट्रीय संगीत क्षेत्रात ज्यांचा गानकोकिळा म्हणून उल्लेख केला जातो त्या श्रीमती लता मंगेशकर यांचे आजोळ होते. बालपणी लता मंगेशकरांचे काही काळ वास्तव्य होते. राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी थाळनेर चे ऐतिहासिक स्थानमहात्म्य लक्षात घेऊन पर्यटन विभागाच्या माध्यमातून सुमारे एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे….’

वाचण्यासाठी 👇टॅप करा




टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

©️
आपल्या मौलिक प्रतिक्रियांचे स्वागतच आहे. पोस्ट आवडल्यास कृपया शेअर करायला विसरू नका. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करू नये. संदर्भ म्हणून वापर करताना ब्लॉग व लेखकाचा उल्लेख जरूर करावा.

लोकप्रिय पोस्ट