" निसर्ग हा सिद्धहस्त कलावंत आहे. अवकाशाच्या कॅॅनव्हासवर हजारो रंगांची उधळण तो क्षणागणीक करत असतो. तो आचाट सामर्थ्यशाली असलेला अंतिम आणि सुर्यप्रकाशाइतका सत्य कलावंत आहे. सूर्य रोज उगवतो त्याची रोज उगवण्याची प्रक्रिया सुद्धा एक अद्वितीय अशी कलाकृती आहे. आपल्या रोजच्या कलाकृतीला साकारताना तो कधीच उदासीन झाल्याचे दिसत नाही. प्रत्येक क्षणाला तो वेगवेगळ्या सौंदर्याची उधळण करत असतो. निसर्गाने आपल्या सामर्थ्यवान कुंचल्यातून साकारलेल्या कलाकृतींची आपल्याला कितीतरी रुप पहावयास मिळतात. सकाळी लाल-पिवळ्या, नारिंगी यासारख्या तेजस्वी छटा,दुपारी क्षितिजापर्यंत पसरलेलं अल्ट्रा व्हायोलेट उन, सायंकाळी गर्द ग्रे, निळसर नारिंगी तर रात्री जाभळ्या संधीरंगाची उधळण निसर्ग करत असतो. या सर्वांच्या कलात्मक सौंदर्याचा निसर्गनिर्मित अविष्कार म्हणजेच तोरणमाळ ! अहिराणीचं लाडकं हिल स्टेशन असलेलं तोरणमाळ आपल्या बेहद्द सौंदर्याने तोरणमाळ निसर्गप्रेमींना नेहमीच खुणावत असत, साद घालत असतो, धकाधकीच्या जीवनातील कृत्रिमपणा क्षणभर भुलवत असतो.राज्याच्या पर्यटन विभागाच्या माध्यमातून पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यटकांना विविध सेवा-सुविधा देण्यावर शासनाचा प्रयत्न आहे..."
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
©️
आपल्या मौलिक प्रतिक्रियांचे स्वागतच आहे. पोस्ट आवडल्यास कृपया शेअर करायला विसरू नका. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करू नये. संदर्भ म्हणून वापर करताना ब्लॉग व लेखकाचा उल्लेख जरूर करावा.